भक्तांनी घरातील बाप्पा समोर केली आकर्षक सजावट - shrisaisagar.blogspot.com

Saturday, August 29, 2020

भक्तांनी घरातील बाप्पा समोर केली आकर्षक सजावट

 गणेश भक्तांनी घरातील बाप्पा समोर केली आकर्षक सजावट 
कोरोना संकटाच्या काळात या वर्षी सार्वजनिक गणपतीने देखावे उभे केले नाहीत. मात्र गणेश भक्तांनी आपल्या घरातील गणपती समोर आकर्षक सजावट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

दरवर्षी सार्वजनिक गणेश उत्सवातील आकर्षण म्हणजे मंडळातील देखावे होत. मात्र या वर्षी कोरोना संकट असल्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून देखाव्यांना परवानगी दिली नाही. मात्र दर वर्षी प्रमाणे यावर्षीही घरातील गणेश उत्सवात कोणतीही कमतरता गणेश भक्तांनी पडू दिली नाही. आपल्यापरीने प्रत्येकजण गणेश पूजा भक्तिभावाने करत आहेत. भक्तांनी केलेली सजावट तर मन मोहून टाकतात.  अशीच उत्तम सजावट केलेले देखावे आणि गणेश पूजेची छायाचित्रे भक्तानी श्री साईसागर कडे पाठवली आहेत. ती छायाचित्र माला आपणास येथे देत आहे. दर्शकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्या. 
































आपल्या घरातील गणपतीची सजावट हजारो दर्शका पर्यँत पोहोचवण्यासाठी सजावटीचे छायाचित्र, नाव आणि पत्ता व्हाट्स अँप क्रमांक ८८०५९९२२०९ वर पाठवा. कोकण, सिंधुदुर्ग भागातील गणेश भक्तांनी तेथील प्रतिनिधी प्रमुख गणेश तोडकर यांच्या ८७६६७४१८४३  क्रमांकावर पाठवा. अखेरची तारीख २ सप्टेंबर २०२० . 

No comments:

Post a Comment

Pages