बयाजी कोते यांचे चिरंजीव गोपीनाथ कोते यांना साई समाधी विशेषांक २०१८ देताना प्रतिनिधि संदेश बांदेकर
शिर्डी चे समाजसेवक पांडुरंग पारखे यांना जानेवारी - फेब्रुवारी - मार्च २०१८ चा अंक देताना प्रतिनिधि संदेश बांदेकर
पणजी महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती सुभदा धोंड यांना जानेवारी - फेब्रुवारी - मार्च २०१८ चा अंक देताना प्रतिनिधि संदेश बांदेकर
समाज सेविका आणि महाराष्ट्र मानव हक्क आयोगाच्या अध्यक्षा शिवप्रिया कौशिक यांना जानेवारी - फेब्रुवारी - मार्च २०१८ चा अंक देताना प्रतिनिधि संदेश बांदेकर
कल्याणच्या ज्येष्ठ साईभक्त माधुरी बागुल (बागुल मावशी) व शामा देशपांडे यांची नात सौ. श्रद्धा शुक्ला यांना जानेवारी - फेब्रुवारी - मार्च २०१८ चा अंक देताना प्रतिनिधि संदेश बांदेकर
शिर्डी च्या एस ९ चॅनेल चे अड्वोकेट सागर सावकारे यांना जानेवारी - फेब्रुवारी - मार्च २०१८ चा अंक देताना प्रतिनिधि संदेश बांदेकर
श्री साई सहवासातील भागोजी शिंदे यांच्या नात सुन ह. भ. प. सौ. माधुरी राजेंद्र शिंदे यांना शिर्डी येथे जानेवारी - फेब्रुवारी - मार्च २०१८ चा अंक देताना प्रतिनिधि संदेश बांदेकर
वेदमूर्ति नीलकंठ स्वामी यांना जानेवारी - फेब्रुवारी - मार्च २०१८ चा अंक देताना शिवा स्वामी आणि प्रतिनिधि हर्षद बर्गे, या अंकात "वीरशैव अस्तित्व" या लेखाचे संकलन त्यांनी केले आहे.
श्री जगद्गुरु पलसिद्धि महाराज धर्मपीठ, साखरखेर्डा चे गुरुमाउली यांना अंक देताना शिवा स्वामी आणि प्रतिनिधि हर्षद बर्गे
शिर्ड़ी संस्थान चे अध्यक्ष सुरेश हावरे यांना श्री साई सागर त्रैमासिकाच्या कार्याबाबत माहिती देताना संपादक धनंजय नाईक
 |
२२ जुलै २०१४ रोजी पुणे येथे रामचंद्र (अण्णा) आडकर व माइ आडकर यांना उदी विशेषांक भेट दिला. |
 |
२२ जुलै २०१४ रोजी पुणे येथे रामचंद्र (अण्णा) आडकर व
माइ आडकर यांना उदी विशेषांक भेट दिला. सोबत "श्री साईसागर"चे
कायदेशीर सल्लागार वकील राहुल रणनवरे होते. अण्णा आडकर
यांनी १३ एप्रिल २०१४ रोजी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
"आरती साईबाबा" या आरतीचे रचनाकर माधवराव आडकर यांचे ते
चिरंजीव आहेत. विशेष म्हणजे अण्णाच्या जन्मानंतर अवघे दोन वर्षांचे
असताना अण्णाना त्यांच्या आजोबांनी श्री साईबाबांचे दर्शनास
शिर्डीस नेले होते. त्यावेळी श्री साईबाबांनी रामचंद्र आडकरयांना आपल्या
मांडीवर घेतले. तसेच रामचंद्र आडकर यांचे "राम" हे नाव
श्री साईबाबांनी ठेवले आहे. श्री साईबाबांचा परिस स्पर्शाने त्यांच्या
जीवनाचे सोने झाल्याचे ते सांगतात. बाबांच्या स्पर्शाने आजही त्यांची
प्रकृती उत्तम आहे. यावेळी आम्ही लहान असूनही अण्णांनी आमचा शाल
देऊन सत्कार केला. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. हा क्षण् आम्ही
कधीच विसरू शकणार नाही. |
 |
| केंद्रीय पर्यटन आणी सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांना श्री सांईसागरचा अंक भेट देताना गोवा प्रतिनिधी जय नाईक. सोबत गोमंतकीय सांई प्रचारक पूज्य शाहू महाराज आणी सांईभक्त बाबी नाईक |
 |
श्री. शाम वीर यांची श्री सांईबाबा पालखी सोहळा समिती, पुणे च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले. १६ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांचे निवास स्थानी सांई पादुका पूजनाचा कार्यक्रम होता. |
 |
| सिक्किमचे राज्यपाल श्री निवास पाटील यांची संपादक धनंजय नाईक यांनी ओगस्ट २०१३ मधे सधिच्छा भेट घेतली. त्यांना श्री साईसागरचे अंक भेट दिल्यावर त्यांनी शिर्डीतील आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, "पुर्वी आम्ही शिर्डीत जात होतो तेव्हा अनेकवेळा समाधीवर जाउन श्री साईबाबांची पूजा केली आहे. बाबांच्या मूर्तीला स्नानही घातले आहे. बाबांचे अंगाला दूध आणि लोणी चोळून त्यांना आंघोळ घालण्यात एक वेगळेच समाधान लाभत असे." यावेळी चपराक वृत्त समूहाचे सर्वेसर्वा घन:शाम पाटील आणि त्यांचे सदस्य उपस्थित होते. |
 |
| श्री साईसागर चा पहीला अंक १९९२ (दिवाळी विशेषांक) मधे प्रकाशित झाला. प्रकाशनच्या काही दिवस अगोदर श्री साईसागर चे प्रचार पत्रकचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते सुधीर दलवी यांचे हस्ते झाले. फोटो मधे सुधीर दलवी आणि संपादक धनंजय नाईक |

|
श्री साईसागरचा पहिला अंक (दिवाळी विशेषांक) ५ ओक्टोंबर १९९२ दसराच्या शुभमुहुरतावर प्रकाशित झाला. साई सहवसातले नानासाहेब नीमोनकर यांचे चिरंजीव गोपालराव नीमोनकर यांचे हस्ते अंकाचे प्रकाशन झाले. कर्वेनगर येथील साई मंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी नानसाहेब चांदोरकर यांचे नातू प्र. वा. चांदोरकर, नुलकर यांचे नातू रामचंद्र नुलकर, अन्नासाहेब गव्हानकर यांचे पुत्र वसंतराव गव्हानकर, लेखक शं. बा. पटवर्धन उपस्थित होते.
गोपालराव निमोनकर यांची प्रकृती ठिक न्हवती. तरीही ते या कार्यक्रमास मोठया उत्साहाने आणी आनंदाने आले. श्री. निमोनकर यांनी अंक हातात घेतला आणी त्याची फित सोडण्याआधी ते सर्वांना म्हणाले, "आज माझी प्रकृती ठिक नाही मात्र बाबांनीच (श्री साईबाबा ) मला येथे येण्याचा आदेश दिला. म्हणून मी येथे आलो." पुढे त्यांनी लेंडी बागेला जाताना श्री साईबाबांनवर छत्री धरलेला फोटोबाबत महिती दिली. या फोटोमधे टोपरे घातलेले जे लहान मुल आहे ते गोपालराव नीमोनकर आहेत. त्याबाबत ते म्हणाले, "मी लहान, तेव्हा मला काही महित नव्हते. एकदा बाबा लेंडीबागेला जाताना त्यांचा फोटो काढण्यात येत होता. बाबा भिंतीला टेकून उभे होते तर बरोबरची भक्त मंडळी उभी होती. तेव्हा मी सुद्धा तेथे धावत् धावत् आलो आणि त्यांच्याबरोबर उभा राहिलो आणि त्यात माझाही फोटो आला." त्यानंतर त्यांनी श्री साईसागर अंकाचे प्रकाशन केले आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटासह फटाक्यांची आतषबाजी झाली. गोपालराव नीमोनकर यानी या कार्यास आशीर्वाद दिले.
|
 |
| श्री साईसागर आयोजित साई मूर्ती व पादुकांवर सामुहिक अभिषेक (दी. १९ जानेवारी २००५) कार्यक्रमात साई भजन सादर करताना प्रमोद मेडी. यावेळी पुण्यातील तुळशीबाग येथील गजानन महाराज मंदिराचे श्री. दवे, अभिनंदन थोरात, चंद्रकांत ठक्कर, शिर्डीचे विठल बरगे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त दास इनामदार, श्री. कुतवल व्यासपीठावर उपस्थित होते. |
 |
श्री साईसागर आयोजित साई मूर्ती व पादुकांवर सामुहिक अभिषेक करताना साई भक्त
 |
 |
श्री साईसागर आयोजित साई मूर्ती व पादुकांवर सामुहिक अभिषेक वेळी साई भक्ताना पूजा सांगताना शिर्डी संस्थानचे पुजारी
प्रमोद मेडी. शेजारी शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त दास इनामदार आणि श्री. लिमये |
 |
श्री साईसागर आयोजित साई मूर्ती व पादुकांवर सामुहिक अभिषेक कार्यक्रमानंतर एका निवांत क्षणी शिर्डी संस्थानचे पुजारी
प्रमोद मेडी आणि संपादक धनंजय नाईक, शेजारी जेष्ट साई भक्त गंगाधर जाधव |
 |
| श्री साई सागर दीपावली २००४ च्या विशेषांकाचे प्रकाशन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाचे कार्यकारी अधिकारी भाउसाहेब वाकचौरे यांचे हस्ते साई समाधी मंदिरात झाले. श्री साई सागर दीपावली २००४ च्या विशेषांकाचे प्रकाशनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाचे कार्यकारी आधिकारी भाउसाहेब वाकचौरे यांनी संपादक धनंजय नाईक यांचा सत्कार केला. |
 |
१९९३ - ९४ मधे श्री साईसागरचा श्री साईसमाधी अमृतमोहत्सवी विशेषांक शिर्डी येथे साईसमाधी मंदिरात अर्पण करताना
संपादक धनंजय नाईक, शेजारी प्रमोद मेडी आणि सतीश मोहिते |
 |
| श्री साईसागरचा पहिला अंक (दिवाळी विशेषांक) ५ ओक्टोंबर १९९२ दसराच्या शुभमुहुरतावर प्रकाशित झाला.पुण्यातून प्रथमच श्री साईबाबांवर अंक प्रकाशित झाला होता. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतीसाद पाहून अंक त्रीमासिक स्वरुपात प्रकाशित करण्याचा विचार झाला आणी एक सांई मेळा घेऊन तसे जाहिर करण्यात आले. हा कार्यक्रम पुण्यात आशीर्वाद मंगल कार्यालयात १३ मार्च १९९३ मधे झाला. या मेळ्यास सिने - नाट्य अभिनेते राजा गोसावी उपस्थित होते. तसेच त्यांचे चिरंजीव आणी प्र. वा. चांदोरकर, रामचंद्र नुलकर, वसंतराव गव्हानकर, मु. ब. निंबाळकर, र. श्री. पुजारी, श. बा. पटवर्धन उपस्थित होते. या सर्वानी श्री सांई सागरच्या या नवीन उपक्रमाचे स्वागत केले. राज गोसावी यांनी त्यांचा शैलीत आपले अनुभव सांगून कार्यक्रमास रंगत आणली. |
 |
१९९४ मधे सुप्रसिध्द गायक अजीत कडकडे यांना गोवा येथे त्यांच्या निवासस्थानी श्री साईसागरचा अंक आणि
आरती पुस्तक भेट देताना संपादक धनंजय नाईक |
 |
शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांना शिर्डी मधे श्री साईसागर चा अंक भेट देताना संपादक धनंजय नाईक |
No comments:
Post a Comment