कुडाळ जवळील अंबडपाल येथील नवनाथ तपोभूमी - shrisaisagar.blogspot.com

Tuesday, September 1, 2020

कुडाळ जवळील अंबडपाल येथील नवनाथ तपोभूमी

कुडाळ जवळील अंबडपाल येथील नवनाथ तपोभूमी


(गणेश तोडकर यांजकडून) 

कुडाळ १ सप्टेंबर २०२० :

कुडाळ पासून साधारण ३ किलोमीटर वर आंबडपाल इथे नवनाथ तपोभूमी आहे, या तपोभूमीची माहिती आणि महती नवनाथ ग्रंथा मध्ये सहाव्या अध्याय मध्ये आहे. या तपोभूमीची माहिती अशी 

कुडाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी कुडाळ नगर परिषद मार्फत सक्रिय आहे. ज्या वेळी तिथे खोदकाम चालू केले त्या वेळी तिथल्या ठेकेदारला स्वप्नात सांगण्यात आले कि "ही नवनाथ तपोभूमी आहे तर इथे एक लहान असं मंदिर बांधून नवनाथांची सेवा कर" त्यानं त्या गावातील ग्रामस्थांना हा विषय सांगितला . ग्रामस्थांनी त्याला सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि अल्पावधीत तिथे नवनाथ मंदिर झाले. हळू हळू त्याची महती वाढू लागली . सुरुवातीला मंदिरा पर्यंत जाण्यास व्यवस्थित रस्ता नव्हता. दर्शनासाठी भक्तजनांची संख्या वाढली तेव्हा मंदिरापर्यंत जाण्यासाठी  रस्ता तयार करण्यात आला आहे. 

या तपोभूमीची आख्ययिका अशी आहे, कि या गावात कालिका देवीचं मंदिर आहे तिला गावात भद्रकाली या नावानं ओळखलं जातं.  या देवीकडे शाबरी शक्ती आहे. नवनाथ संप्रदायातील मुख्य श्री मच्छिन्द्र नाथ याना शाबरी विद्येवर कवित्व करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी तप करून देवतांना प्रसन्न करून आपली इच्छा व्यक्त केली.  त्या वेळी त्या देवतांनी "ही शाबरी विद्या कोकण प्रांतात अडुळ गावी (आताचे आंबडपाल या गावी) कालिकाकडे आहे,  तरी त्या देवीला प्रसन्न करून घेऊन शाबरी विद्या मिळवावी" असे सांगितलं.  त्या नंतर मछिंद्र नाथ या गावी आले आणि आता जी तपोभूमी म्हटली जाते तिथे बसून तप चालू केले.  बऱ्याच कालावधीने देवी त्यांना प्रसन्न झाली आणि विचारलं, कि "तुला काय पाहिजे"  त्या वेळी नाथ म्हणाले, कि "देवी, शाबरी विद्या तुझ्या कडे आहे ती मला द्यावी" यावर देवी म्हणाली, "तू दुसरं काहीही माग, पण शाबरी विद्या मागू नकोस, ती मी तुला देणार नाही." यावर नाथानी खूप विनवण्या केल्या पण देवी ऐकेना.  मग नाथानी तिच्याशी युद्ध केलं.  खूप निकाराचं युद्ध झालं.  या वेळी नाथानी देवीला आपल्या मंत्र शक्तीने मूर्च्छित केलं. मग शंकर देव त्या ठिकाणी आले.  नाथांना म्हणाले, कि  "देवीला शुद्धीवर आण." मग नाथानी देवीला शुद्धीवर आणले.  त्या वेळी शिवशंकर देवीला म्हणाले, कि "देवी, हा मछिंद्र नाथ विष्णूचा अवतार आहे. त्याला विद्या दे आणि सहकार्य कर." त्या नुसार देवींने विद्या दिली आणि सहकार्य करण्याचं वचन दिलं.  त्या वेळी शिवशंकर आणि मच्छिन्द्र नाथ या भूमीवर राहिले होते म्हणून या भूमीला नवनाथ तपोभूमी असं म्हटलं जातं. या तपोभूमीच्या दर्शनाला खूप लोकं येत असतात.  या  तपोभूमीचा खूप लोकांना चांगला अनुभव आला आहे. भक्तांनी एकदा तरी या स्थानाला भेट देऊन अनुभव घ्यावा. 

मंदिराचा पत्ता :

नवनाथ तपोभूमी, आंबडपाल, तालुका कुडाळ, सिंधुदुर्ग

No comments:

Post a Comment

Pages